9404366946, 9226953090, 9420751257 |   info@reshimgathivivah.com

About us

नियम व अटी

  1. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबी खाली परत मिळणार नाही.
  2. नाव नोंदणीसाठी केंद्राचा Enroll Form फोटो सहीत वेबसाईटवरून भरून पाठवावा किंवा केंद्रात आल्यास नोंदणी फॉर्म फोटो सहीत भरून द्यावा
  3. नाव नोंदणी केल्यावर सभासदांनी, गेल्या वर्षभरात नोंदणी केलेल्या स्थळातून आपल्या स्थळास अनुरूप असलेल्या स्थळांची माहिती घेऊन संबंधितांशी संपर्क करावा. गेल्या वर्षभरात नोंदविलेल्या सर्व स्थळांची माहिती वेबसाईटवर घरी पहावयास मिळेल. केंद्रामध्ये सभासदांचे बायोडाटा पाहण्याची सोय उपलब्ध आहे.
  4. वेबसाईटवर Search Option मधून वय, उंची, मंगळ, शिक्षण, नोकरी, किंवा व्यवसायाचे ठिकाण, मूळ गाव, सध्या राहण्याचे ठिकाण या सर्वावरून फोटोसह स्थळे शोधता येतात.
  5. नावनोंदणी नंतर आपल्या स्थळाची माहिती ४८ तासात वेबसाईटवर टाकली जाते. त्यामुळे इतर सभासदांना आपली माहिती योग्य वाटल्यास ते हि आपणास संपर्क करू शकतात.
  6. आपण संपर्क केलेल्या सभासदांना आपला नोंदणी क्रमांक सांगितल्यास ते आपली माहिती व फोटो वेबसाईटवर सर्च करून कुठेही पाहू शकतील.
  7. वेबसाईटवर Profile With Contact मध्ये आपण निवडलेल्या स्थळांचे फोन नं/ ईमेल/ पत्ते मिळतात. किंवा केंद्रात फोन केल्यास अनुरूप स्थळांचे फोन नं. SMS द्वारे पाठविले जातील. तसेच आपण केंद्रातून घेतलेल्या सर्व स्थळांना आपला इंटरेस्ट आमच्यातर्फे त्वरित ईमेलने व SMS द्वारे पाठविला जातो.
  8. केंद्रातून एका सभासदाला दर सात दिवसातून त्यांचे स्थळाला मॅच होणार पाच बायोडाटे घेता येतात. म्हणजे प्रत्येक सभासद दर सात दिवसात पाच बायोडाटे घेऊ शकतो.
  9. केंद्राच्या वेबसाईटवर Photo सेक्शन मधून आपला फोटो मोफत बदलता येतो. आपल्या माहिती मध्ये काही बदल करावयाचा असल्यास ते ईमेल किंवा फोनवरून कळवावे.
  10. विवाह योग केंद्रातर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यास त्या संबंधीची माहिती कार्यालयास कळवावी. केंद्रातर्फे विवाहयोग जमल्यास देणगी द्यावी लागत नाही.
  11. आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा आपले नातलग, मित्र मंडळी मार्फत करून घ्यावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थीत झाल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही. ती जबाबदारी सभासदांची आहे.
  12. नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र देऊ शकत नाही.
  13. पालकांनी मुला/मुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत व शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्थळे घ्यावीत.
  14. केंद्राकडून नेलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करता कामा नये. तसे आढळ्यास संबंधित सभासदाचे सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल.